राज्य सरकारच्या अपयशी धोरणांमुळे महिला आणि बालकांचे आरोग्य धोक्यात
बेळगाव: सरकारी सिव्हिल हॉस्पिटल मध्ये गर्भिणी व नवजात शिशुच्या वाढत्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर भाजप सत्यशोधक समितीने पत्रकार परिषद बोलावली होती. राज्य काँग्रेस सरकारच्या धोरणांवर शिरहट्टीचे आमदार चंद्रू लमाणी जोरदार टीका केली.
भारतीय जनता पक्षाच्या सत्यशोधक समितीने गर्भिणी व नवजात शिशुच्या मृत्यूच्या घटनांवर प्रकाश टाकत, राज्य सरकारच्या आरोग्य व्यवस्थेतील त्रुटींवर प्रश्न उपस्थित केले. शिरहट्टीचे आमदार चंदू लमाणी यांनी या पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले की, राज्य सरकारच्या अपयशी धोरणांमुळे महिला आणि बालकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गंभीर परिस्थितीकडे दुर्लक्ष होऊ नये.
या पत्रकार परिषदेला राज्य महिला मोर्चाच्या प्रधान कार्यदर्शिका डॉ. शोभा निसीमगौडर, राज्य उपाध्यक्षा डॉ. विजयलक्ष्मी तुंगाळ, राज्य कार्यदर्शिका सोनाली सरनाबोत, सामाजिक जाळे राज्य सह-संचालक प्रदीप कदम, राज्य सामाजिक जाळे समितीचे सदस्य नितीन चौगुले, जिल्हा माध्यम प्रमुख सचिन कडि, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा शिल्पा केकरे, सोशल मीडिया जिल्हा संचालक सुभाष सणवीरप्पनवर, मनोज पाटील आणि इतर मान्यवरांची उपस्थिती होती.