श्री राम सेना हिंदुस्थान तर्फे श्री राम नवमी निमित्त काढण्यात आलेली भव्य शोभायात्रा लक्षवेधी ठरली. सायंकाळी काढण्यात आलेल्या शोभयात्रेने शोभयात्रा पाहण्यासाठी जमलेल्या लोकांच्या डोळ्याचे पारणे फिटले. मिरवणुकीत वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या कला पथकांनी जनतेची मने जिंकली. शोभयात्रेत श्री राम, हनुमान आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्यांनी लक्ष वेधून घेतले.https://dmedia24.com/cabbage-and-other-vegetable-prices-fall-drastically/
नरसिंह, वराह आदी वेशभुषा परिधान केलेल्या कलाकारांच्या बरोबरच चित्रविचित्र मुखवटे घातलेल्या कलाकारांचे सादरीकरण साऱ्यांची दाद मिळवून गेले. अश्वमेधाचा घोडा घेऊन जाणारे लव आणि कुश देखील शोभयात्रेचे आकर्षण ठरले होते. समई नृत्य करणाऱ्या कलाकारांनी सादर केलेला पिरॅमिड पाहून लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
गोव्यातून आलेल्या कला पथकांनी देखील आपली कला सादर करून लोकांची दाद मिळवली. याशिवाय शोभयात्रेत झाँज पथक, तरुणीचे लेझीम पथक, भजनी मंडळ देखील शोभयात्रेत सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख मार्गांवर फिरून शोभयात्रेची सांगता झाली. शोभायात्रा पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.