महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सिमाभाग यांच्या वतीने चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांची भेट घेण्यात आली. युवा समिती सिमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांना प्रशासनाने हद्दपारची नोटीस बजावली आहे, तरी या दडपशाहीच्या विरोधात महाराष्ट्र सरकारने आवाज उठवावा यासाठी यासाठी आमचा निरोप महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवा अशी विनंती केली. यावेळी शिवाजीराव पाटील यांना बाळेकुंद्री येथील बस वाहकाच्या खोट्या आरोपापासून ते किणये येथील मराठी भाषेच्या विरोधात पी डी ओ ने केलेली अरेरावी त्यानंतर या मराठी भाषेची आग्रह धरणाऱ्या युवकाचा सत्कार केल्याने शुभम शेळके यांना हद्दपारची नोटीस बजावण्यात आली या संदर्भात शुभम शेळके यांनी सविस्तर माहिती दिली. गेल्या महिन्याभरापासून माझ्यासह कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे घालून करण्यात येणाऱ्या दडपशाहीच्या वृत्तपत्रातील बादम्या दाखवल्या. https://dmedia24.com/saiwari-bronze-in-junior-national-championship/
शिवाजीराव पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करु आणी मराठी भाषेच्या तसेच सीमाप्रश्नासाठी आंदोलन करणाऱ्या युवकांच्यावर खोटे गुन्हे घालून नाहक त्रास दिला जात असल्याचे निदर्शनास आणून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी अध्यक्ष शुभम शेळके, सरचिटणीस मनोहर हुंदरे, उपाध्यक्ष प्रविण रेडेकर, उपाध्यक्ष नारायण मुंचडीकर, विजय जाधव, चंद्रकांत पाटील, रामनाथ मुंचडीकर, सुयोग कडेमनी आदी उपस्थित होते.