पॉलिटेक्निकच्या प्रथम वर्ष अभ्यासक्रमाला तीन जुलैपासून सुरुवात
पॉलिटेक्निकच्या प्रथम वर्ष अभ्यासक्रमाला सोमवार ३ जुलैपासून सुरुवात होणार आहे. यावर्षी विद्यार्थ्यांचा तांत्रिक शिक्षणाकडे ओढा राहिल्याने पॉलिटेक्निकचे- प्रवेश वाढले आहेत.
पीयूसीनंतर डिप्लोमा अभ्यासक्रमाला सुरुवात होणार असल्याने पॉलिटेक्निक कॉलेज परिसरात विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी तयारी सुरू आहे. बेळगावमध्ये शासकीय अनेक कॉलेजसह पॉलिटेक्निक कॉलेज खासगी आणि अनुदानित पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढली होती.
त्यातही कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिक या विभागांना सर्वाधिक मागणी असल्याने प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागली. गुणवत्ता अधिक असणाऱ्या विद्यार्थ्यांना शासकीय पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला.
बेंगळूर तांत्रिक विभागाने परिपत्रक जाहीर 5 केले असून त्यांनुसार दि. ३ अभ्यासक्रमाला सुरुवार होणार आहे.