https://www.instagram.com/reel/CyC-W5zB9Tt/?igshid=MWZjMTM2ODFkZg==
बेळगाव विमानतळावर काल इंडिगो च्या दिल्ली बेळगाव या पहिल्या फ्लाईटचे स्वागत जल्लोषात करण्यात आले याव्यतिरिक्त इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टमच्या उद्घाटनाने देखील विमानतळावर अनेकांचा उत्साह मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसला.
आता बेळगाव ते दिल्ली आणि दिल्ली ते बेळगाव अशी विमान प्रवास सुरू झाले असून दिल्लीला बेळगावतून सुटलेले विमान हे दोन तास 20 मिनिटांनी पोहोचणार आहे तसेच याकरिता तिकीटचा दर 5294 पासून पुढे असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
गेल्या काही महिन्यांपूर्वी बेळगाव ते दिल्ली अशी विमान प्रवास सेवा सुरू करण्यात आली होती मात्र ही सेवा काही काळापुरती सुरू ठेवण्यात आली त्यानंतर ही सेवा बंद झाली.
त्यामुळे प्रवाशांच्या मागणीनुसार आता बेळगाव दिल्ली हा विमान प्रवास व्हावा अशी नागरिकांची मागणी असल्याने इंडिगो ने दिल्ली ते बेळगाव करीता आपली सेवा रुजू केली आहे. त्यामुळे दिल्ली अब दूर नाही असे बेळगाव वासिय म्हणत आहेत