पर्यावरणाचे रक्षण राखण्याकरिता पहिली सायकल बाईक शेअरिंग व्यवस्था सुरू
पर्यावरणाचे रक्षण राखण्याकरिता तसेच वेळ आणि पैसा याची बचत करण्याकरिता शहरात पहिल्यादाच पहिली सायकल बाईक शेअरिंग व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. या सेवेचा शुभारंभ आज चन्नम्मा सर्कल येथे उत्तरचे आमदार अनिल बेनके जिल्हाधिकारी नितेश पाटील आणि स्मार्ट सिटी चे व्यवस्थापक प्रवीण बागेवाडी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी हीई सायकल बाईक शेअरिंग व्यवस्था कशा प्रकारे महत्त्वाची आहे यामुळे आपल्याला कोणकोणते फायदे होणार आहेत याची माहिती अनिल बेनके यांनी दिली.
यावेळी ते म्हणाले की सर्वांनी या सायकलचा सदुपयोग करून घ्यावा यामुळे पेट्रोल वाचेल त्याशिवाय पर्यावरण ही सुरक्षित राहील अशी माहिती दिली.
त्यानंतर जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी नागरिकांना माफक दरात सायकलचे भाडे भरण्याची व्यवस्था केली असल्यासचे सांगितले. सदर बायसिकल नागरिकांसाठी आहे याचा वापर नागरिकांनी करावा या बाईकमध्ये तीन प्रकार आहेत बायसिकल ई बायसिकल आणि ई बाईक चा वापर नागरिकांनी पुरेपूर करावा तसेच सुवर्ण साउथ जवळ देखील ही सुविधा देण्यात आली असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन याप्रसंगी त्यांनी केले.यावेळी बीजेपीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते