होणारी वृक्षतोड थांबवली
परवानगी नसताना मंडोळी रोडवर एक जुनाट वृक्ष तोडण्यात येत होते यावेळी ही माहिती युवा भाजप नेते किरण जाधव यांना समजताच त्यांनी या ठिकाणी उपस्थित असलेल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना याचा जाब विचारला आणि झाडांची कत्तल तात्काळ रोखण्यास सांगितले.
आज सकाळी येथील मोठे जुने वृक्ष वनखात्याकडून जमीन दोस्त करण्यात आले. यावेळी किरण जाधव यांनी झाडे तोडणाऱ्या वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना चांगली धारेवर धरून तंबी दिली.आणि होणारी वृक्षतोड थांबविली.
कोणाची तक्रार नसताना तसेच विद्युत वाहिन्या वगैरे नसताना चा कारण देत विनाकारण येथील वृक्षतोड करण्यात येत होते. यावेळी वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना किरण जाधव यांनी जाब विचारला आणि त्यांच्याकडून परवानगी पत्राची विचारणा केली.
यावेळी त्यांनी आमच्याकडे परवानगी पत्र नाही आमच्या साहेबांना सांगितला आहे म्हणून आम्ही झाडे आहे असे सांगितले यावेळी किरण जाधव यांनी परवानगी नसताना तुम्ही कसे येथील झाड तोडू शकता असे विचारले.
यावेळी मंडोळी रोडवर वृक्षतोड रोखून जाब विचारात असताना बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यावेळी टिळकवाडी पोलिस स्थानकाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील घटनास्थळी दाखल झाले होते. भाजप युवा नेते किरण जाधव यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करताच झाडाची होणारी कत्तल थांबली.