*”कुत्रा वाटला का… पण हा रोबो आहे!”*
मुंबई,: प्रत्येक वर्षी नवनवीन कल्पना घेऊन येणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) ने यावर्षी क्रिकेट प्रेमींसाठी एक अनोखा अनुभव दिला आहे – तो म्हणजे रोबो डॉग “चंपक”.
हा यांत्रिक कुत्रा मैदानावर धावत-फिरत, कॅमेऱ्याद्वारे विशेष क्षण कॅप्चर करत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. क्रिकेटपटूंसोबत मैत्रीपूर्ण वागणूक देणारा हा “चंपक” लहान मुलांपासून ते थोरांपर्यंत सर्वांच्या आवडीचा बनला आहे.
चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एम.एस. धोनी यांनी या रोबो डॉगसोबत केलेल्या गमतीजमतीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. हे IPL मध्ये तंत्रज्ञान आणि मनोरंजनाच्या मिश्रणाचे एक उत्तम उदाहरण आहे.
अशा नावीन्यपूर्ण कल्पनांद्वारे IPL ही केवळ क्रिकेट स्पर्धा नसून, एक पूर्ण कुटुंबासाठीचा मनोरंजनाचा उत्सव आहे हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.