लॉरी कार अपघातात डॉक्टरचा जागीच मृत्यू
बेळगाव:पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात एका डॉक्टरचा जागीच मृत्यू झाला. बेळगाव तालुक्यातील हिरे बागेवाडी जवळ लॉरी आणि कारमध्ये हा अपघात घडला.धारवाड होऊन बेळगावकडे येत असताना हा अपघात घडल्याची माहिती उपलब्ध आहे.
मुडलगी तालुक्यातील संगनकेरी येथील डॉ.आशा कोळी (३२) असे मृताचे नाव आहे.आशा यांचे पती या घटनेत भीमप्पा कोळी, चालक महेश खोटा हे गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना हिरेबागेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला.