श्री ब्रम्हलिंग देवस्थानच्या नूतन मंदिराचा लोकार्पण सोहळा उत्साहात होणार
चलवेनहट्टी गावचे ग्रामदैवत श्री ब्रम्हलिंग देवस्थानच्या नूतन मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. अशी माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेत चलवेनहट्टी ग्रामस्थांनी दिली यावेळी गावातील नागरिकांनी या पत्रकार परिषदेत मंदिरची वास्तुशांती मूर्ती प्राणप्रतिष्ठापना कळसा रोहन व उद्घाटन सोहळा पार पडणार असल्याची माहिती दिली.
सोमवार दिनांक 1 मे पासून शुक्रवार दिनांक 5 मे पर्यंत हा लोकार्पण सोहळा पार पडणार असून पहिल्या दिवशी भव्य कळस मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात संपन्न होणार आहे. तसेच कळस मिरवणुकीचे उद्घाटन यावेळी मनोहर पाटील आणि शांताराम आलगोंडी यांच्या हस्ते करून दुपारी महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी उपसचिव मनोहर हूंदरे यांनी दिली.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी देवाचा अगरहोम पूजा श्री शिवसिद्धेश्वर शिवचार्य महास्वामी यांच्या हस्ते करणारा असून तिसऱ्या दिवशी गोमाता पूजन व वास्तुशांती तर चौथ्या दिवशी मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कळसारोहन पार पडणार आहे तर शेवटच्या दिवशी सत्यनारायण पूजा सत्कार समारंभ पार पडणार आहे या सोहळ्याच्या पाचची दिवस महाप्रसादाचे वितरण करण्यात असून या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन यावेळी पत्रकार परिषदेत चलवेनहट्टी ग्रामस्थांना नागरिकांनी केले आहे.
याप्रसंगी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष मल्लाप्पा बडवानाचे, उपाध्यक्ष नंदा हूंदरे, उपसचिव मनोहर हूंदरे, सदस्य नारायण पाटील, लक्ष्मण बडवानाचे, बाबू पाटील, भरमा अलगोडी, गुंड पाटील ,मल्लाप्पा हूंदरे, प्रकाश बडवानाचे, परशराम बडवानाचे, अंकुश किजवाडकर, तानाजी पाटील ,वैजू पाटील यांच्यासहित सर्व उपस्थित होते.