चिमण्यांची घटती संख्या चिंताग्रस्त
बेळगाव प्रतिनिधी: लहान मुलाला घास भरवताना त्या मुलाची आई ‘ येग चिऊ , येग चिऊ ‘ असे आवाहन करून चिमणीला बोलवत असते. हल्ली चिमण्यांची संख्या दुर्मिळ झाली आहे. बाळाला खाऊचा घास भरवताना चिमणीला बोलवण्यासाठी आज चिमणीच शिल्लक राहिल्याचे दिसत नाही. नुकताच जागतिक चिमणी दिवस साजरा झाला. त्या पार्श्वभूमीवर दुर्मिळ होत चाललेल्या चिमण्यांच्या संख्येबाबत तीव्र चिंता सर्वच थरातून व्यक्त करण्यात येत आहे.
पूर्वी चिमण्यांचा चिवचिवाट मोठ्या प्रमाणावर ऐकायला मिळत असे. सध्या चिमण्यांचा चिवचिवाट ऐकतो म्हटले तरी चिवचिवाट ही नाही आणि चिमणीही दिसत नाही. हल्ली अनेक विविध कारणांमुळे चिमण्यांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर घटत चालली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने उंच उंच उभारण्यात येणारे मोबाईलचे टावर हे एक कारण आहे. पूर्वीच्याकाळी चिमण्यांसाठी अंगणामध्ये पाण्याची आणि त्यांच्या खाण्याची व्यवस्था करण्यात येत होती. आता चिमण्याच दुर्मिळ झाल्यामुळे ना त्यांच्या खाण्याची ना त्यांच्या पाण्याची व्यवस्था करण्याचा प्रश्नच नाही. चिमण्यांचा चिवचिवाट ऐकून कित्येक दिवस झाले आहेत. https://dmedia24.com/the-class-x-exams-begin/
चिमण्यांचा चिवचिवाट पुन्हा ऐकण्यासाठी कान आतुरले आहेत. ये ग चिऊताई, ये ग चिऊताई माझ्या बाळाला तूप रोटी देऊन जाई असे म्हणणारी माता आज दिसून येत नाही.