केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्षाने छेडले आंदोलन
भारतीय अन्न मंडळाने ऐनवेळी नाकार दिल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीने आज शहरांमध्ये आंदोलन छेडण्यात आले.कर्नाटक राज्य सरकारच्या सर्वसामान्य गरीब जनतेला 10 किलो मोफत तांदूळ देण्याच्या महत्त्वकांक्षी अन्यभाग्य योजनेसाठी तांदूळ उपलब्ध करून देण्यास केंद्र सरकारने नकार दिला असल्याने त्याचा निषेधार्थ कर्नाटक काँग्रेस पक्षाच्या वतीने आज शहरात आंदोलन करून आपल्या मागणीचे निवेदन सादर केले.
यावेळी या मोर्चामध्ये शेकडो कार्यकर्ते आणि महिला सहभागी झाल्या होत्या.त्यांनी काँग्रेसच्या झेंडा घेऊन तसेच तांदळाच्या पिशवी आणि बुट्टी घेऊन वेगळ्या प्रकाराचे आंदोलन चन्नम्मा सर्कलमध्ये छेडले.
राज्यातील काँग्रेस सरकारची महत्वपूर्ण आणि जनहितार्थ अन्नभाग्य योजना अंतर्गत बीपीएल व एपीएल कार्डधारकांना दहा किलो मोफत तांदूळ देण्यात येणार होते. सदर योजना एक जुलैपासून सुरू होणार आहे. मात्र त्या आधीच केंद्र सरकारच्या निर्देशनानुसार भारतीय अन्न महामंडळाने ऐनवेळी नकार दिल्याच्या निषेधार्थ आज आंदोलन काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी छेडले.
यावेळी आंदोलनात बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी उत्तरचे आमदार असिफ राजू शेठ महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर तसेच काँग्रेसचे अन्य नेते मंडळी उपस्थित होते