काँग्रेस सरकार हे शेतकरी विरोधी सरकार आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी किसान सन्मान योजना लागू केली आहे. मात्र या योजनेसह अनेक योजना काँग्रेस सरकार रद्द करण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठ्या अन्याय होणार असून काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांचा विचार करून आपला निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी आज भाजप पक्षाच्यावतीने आंदोलनाद्वारे करण्यात आली.
यावेळी शहरात मोठ्या आंदोलन छेडण्यात आले याप्रसंगी माजी मंत्री व विद्यमान आमदार शशिकला जोल्ले यांनी राज्यातील काँग्रेस सरकारवर कडाडून टीका केली तसेच काँग्रेसवर हल्लाबोल केला यावेळी त्या म्हणाल्या की शेतकऱ्यांच्या 19 योजना काँग्रेस सरकार रद्द करत आहे.
आपला पोशिंद्याचेच हे हाल होणार असेल तर सामान्य नागरिकांचे काय असा त्यांनी प्रश्न उपस्थित केला असून जर काँग्रेस सरकारने आपला निर्णय मागे घेतला नाही तर येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन छेडू असा इशारा यावेळी त्यांनी दिला.
प्रारंभी कन्नड साहित्य भवन येथे पत्रकार परिषद मध्ये त्यांनी काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यानंतर जनतेवर विशेष करून देशाचा अन्नदाता असलेल्या शेतकऱ्यांवर मोठा तसेच अल्पभूधारक गरीब शेतकऱ्यांना थोडे आर्थिक सहाय्य देण्यात यावे त्यांचे जीवन सुसह्य करावे त्यांच्यावर कर्ज वगैरे घेण्याची वेळ येऊ नये अशी मागणी केली.
भाजप सरकारने या सर्व गोष्टींचा विचार करून या योजना लागू केल्या होत्या मात्र आता काँग्रेस सरकार या योजना रद्द करत असल्याने भाजप सरकारने तीव्र नाराजी व्यक्त केली. आणि जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागणीचे निवेदन दिले.
यावेळी माजी मंत्री शशिकला जोल्ले,माजी आमदार महंतेश कवठगिमठ, माजी आ संजय पाटील उज्वला बडवानाचे यांच्या सहीत भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.