नंदगड येथील नावलौकिक असलेल्या संत मेलगे हायर प्रायमरी शाळेची अवस्था जनावरांच्या गोट्यापेक्षा बाद झालेली आहे एकेकाळी नंदगड पंचक्रोशी मध्ये नावलौकिक असलेली संत मेलगे हायर प्रायमरी शाळेची दुरावस्था झालेली आहे. बऱ्याच वेळा मागील चार वर्षापासून प्रशासना दरबारी एसडीएमसी सदस्य सामाजिक कार्यकर्ते या शाळेच्या सुधारण्यासाठी निवेदनाची खैरात करून सुद्धा अतिशय अक्षम्य असं दुर्लक्ष प्रशासनाच्या अधिकाऱ्याने केले आहे.
शाळेची एकूण पटसंख्या 120 च्या पुढे असताना या शाळेमध्ये अंगणवाडी पासून सातवी पर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेत असतात शाळेसमोरील ग्राउंड मध्ये चिखल होऊन दुर्गंधी येत आहे.यामुळे विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाता सुद्धा येत नाही वर्गांची छताची कवले फुटल्यामुळे पाणी गळून वर्गात पाणी साचले आहे.यामुळे काही वर्ग बंद ठेवून विद्यार्थ्यांना इतर वर्गामध्ये बसावे लागत आहेत येणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या आधी शाळेसमोरील पटांगणाची दुरुस्ती व्हावी व वर्ग खोल्यांची दुरुस्ती व्हावी अन्यथा संबंधित अधिकाऱ्याच्या घरी त्यांच्या ऑफिसमध्ये व ग्रामपंचायतीमध्ये विद्यार्थ्यांना नेऊन बसवण्याचे गावातील सामाजिक कार्यकर्ते व एचडीएमसी सदस्यांनी घेतली आहे तरी प्रशासनाने याकडे लक्ष घालून शाळेची दुरुस्ती करावी एकीकडे तालुक्याच्या इतर शाळांमध्ये पटसंख्या रोडावल्यामुळे पटसंख्या सुधारण्याचे काम हाती प्रशासनाने घेतले असता मुद्दाम जाणीवपूर्वक मराठी शाळांच्याकडे जाणीव दुर्लक्ष प्रशासन करत आहे असा संशय बळावला आहे तरी या शाळेची दुरुस्ती लवकरात लवकर येत्या 15 ऑगस्ट च्या आधी व्हावी अशी प्रशासन दरबारात विनंती आहे.
यावेळी गंगाराम पाटील,महादेव करविंकोप,राजू पाटील,शंकर कुंभार्डेकर,किशोर बिडीकर,रेणुका ऱ्हाटोळकर, रेणुका पाटील इतर उपस्थित होते.