श्री शिव शक्ती युवा संघटनेची स्पर्धा उत्साहात
बिजगर्णी येथील श्री शिव शक्ती युवा संघटना यांच्यावतीने मोटरसायकलसोबत म्हैस पळविण्याची भव्य जंगी शर्यत आयोजित करण्यात आली होती. यावेळी शर्यतीचे उद्घाटन माजी आमदार संजय पाटील व बक्षीस वितरण समारंभ माजी जिल्हा पंचायत शिक्षण व आरोग्य स्थायी समिती अध्यक्ष मोहन मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा ग्रामीण मंडळ अध्यक्ष युवराज जाधव, धनंजय जाधव, महाराष्ट्र एकीकरण समिती नेते आर. एम चौगुले, ग्रामस्थ कमिटी चेरमण वसंत अस्तेकर, ग्राम पंचायत अध्यक्ष नाईक ,उपाध्यक्ष नामदेव मोरे, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष मनोहर बेळगावकर आदी सदस्य उपस्थिती होते.
शर्यतीचा लहान गट व मोठा गटातील स्पर्धकाना तब्बल पदराहून अधिक बक्षिसे वितरण करण्यात आले. यावेळी सूत्रसंचालन प्रकाश बेळगुंदकर यांनी केले.तर आभार शट्टुप्पा तारिहाळ्कर यावेळी बेळगाव विभागातील गवळी बांधव तसेच मंडळाचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.