समितीने कोल्हापूरला रवाना
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी व्हॅक्सिन डेपो मैदानावर प्रति मराठी भाषिकांचा महामेळाव्याचे आयोजन करण्यात येते मात्र याला कर्नाटक प्रशासनाने विरोध केल्याने त्याचा निषेध करण्याकरिता आणि या करण्यात आलेल्या दडपशाही बद्दल महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी चलो कोल्हापूरचा नारा दिला आहे त्यानुसार त्यांनी आज सकाळी एसपीएम रोडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार घालून तसेच अभिवादन करून कोल्हापूरला रवाना झाले आहेत.
बेळगाव येथून समस्त महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते कोल्हापूर येथे आंदोलन करण्यासाठी रवाना झाली असून त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देणार आहेत.
आता सर्व कार्यकर्ते कोल्हापूरला रवाना झाले असून ते जाता जाता घोषणा देत आहेत छत्रपती शिवाजी महाराज की जय बेळगाव कारवार निपाणी बिदर भालकी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. रहेंगे तो महाराष्ट्र मे नही तो जेल मे तसेच शिवरायांची गीते गात रवाना झाले आहेत.
तसेच कोगनोळी येथे सर्वजण एकत्रित जमत तेथून गाड्यांना भगवे झेंडे लावून तेथून बाईक रॅली काढत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याकरिता रवाना झाले आहेत.