दहावीच्या परीक्षेला प्रारंभ
पहिल्या दिवशी प्रथम भाषा विषयाचा पेपर
बेळगाव प्रतिनिधी:
शुक्रवार दिनांक 21 मार्चपासून दहावीच्या वार्षिक परीक्षेला प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी प्रथम भाषा विषयाचा पेपर झाला.
परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी त्यांचे पालक ही आले होते. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर परीक्षेबाबत आत्मविश्वास जाणवत होता. यावरून त्यांनी परीक्षेचा अभ्यास चांगला केल्याची खात्री त्यांना होती. परीक्षा संपल्यानंतर प्रत्येक विद्यार्थी हसतमुखाने परीक्षा केंद्रातून बाहेर येताना दिसून आला.
काही विद्यार्थ्यांचे पालक त्यांच्या मुलांना दुचाकी वाहनावरून परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी आले होते. विद्यार्थी वेळेवर उपस्थित झाले होते. परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शनिवारी आणि रविवारी परीक्षेला सुट्टी आहे. त्यामुळे आता सोमवारी गणित विषयाचा पेपर आहे. त्यामुळे गणित या अवघड विषयाचा चांगला अभ्यास करण्यासाठी पुन्हा विद्यार्थ्यांना दोन ते अडीच दिवसांचा वेळ मिळणार आहे. https://dmedia24.com/dont-bring-maharashtra-bus-to-karnataka-tomorrow/
चार एप्रिल रोजी शेवटचा पेपर होऊन दहावीच्या परीक्षेची सांगता होणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील एक महत्त्वाची परीक्षा म्हणून दहावीच्या परीक्षेकडे पाहिले जाते.