उत्तर वर भगवा फडकवायला कंग्राळ गल्लीच्या नागरिकांनी कसली कंबर.
प्रचाराच्या अंतिम टप्यात बेळगाव उत्तर मतदार संघात समिती आणि काँग्रेस मध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे. बेळगाव उत्तर मतदारसंघ मराठी उमेदवार जिंकू शकत नाही अशी अफवा पसरून मराठी मतदारांना भरकटविण्याचा प्रयत्न राष्ट्रीय पक्ष करू लागले आहेत यांना प्रतीक तर म्हणून बेळगाव उत्तर मध्ये मराठी उमेदवारच निवडून आणण्यासाठी आता मराठी भाषिक स्वतःहून रस्त्यावर उतरले आहेत. बेळगाव उत्तर मतदारसंघांमध्ये मराठा उमेदवाराला राष्ट्रीय पक्षांनी डावल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे
मागच्या विधानसभा निवडणुकीत भडगाव उत्तर मराठा उमेदवारच निवडून येऊ शकतो हे पक्के असले तरी राष्ट्रीय पक्षांनी मराठा समाजाशी दुजाभाव केला पण कायम मराठी भाषिक आणि मराठा समाजाची सोबत असणारी महाराष्ट्र एकीकरण समितीने मात्र लोकांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही. आणि म्हणूनच बेळगाव उत्तर मधील मराठी जनता आता एक वाटू लागलेली आहे आणि आपला एक मुखी पाठिंबा महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार श्री अमर यळूरकर यांना जाहीर करत आहे.
याचाच भाग म्हणून कंग्राळ गल्लीतील नागरीक स्वतःहूनच आपल्या भागातील घराघरात जाऊन अमर येळ्ळूरकर यांचा प्रचार करीत आहेत. कारण मराठी समाजामध्ये फूट पाडून त्याचा फायदा हा नकळत काँग्रेसला करून देण्याचा घाट इथल्या स्थानिक राज्यकर्त्यांनी केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मराठी लोकांनी संघटितपणे समितीला मतदान करणे ही आता काळाची गरज बनली आहे. आणि म्हणूनच उमेदवार नसताना देखील नागरिक स्वतःहून इतरांच्या घरी जाऊन समितीचा प्रचार करताना दिसत आहेत