अर्धनग्न मोर्चा काढत केंद्र सरकारचा केला निषेध व्यक्त
केंद्र सरकार देशातील सीबीआय, ईडी, प्रसिद्धी माधाम, आयकर विभाग वगैरे संविधानिक संस्थाचा दुरुपयोग वत्रत असल्याच्या, त्याचप्रमाणे निधर्मी जनता दल आणि भारतीय जनता पक्षाचे नेते कुटील कारस्थान करून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना त्यांच्या पदावरून खाली खेचण्याचा प्रयत्न करत असल्याच्या निषेधार्थ आज कर्नाटक राज्य दलित संघर्ष समितीतर्फे शहरात अर्धनग्न
मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सुरादर करण्यात आले.
कर्नाटक राज्य दलित संघर्ष समिती बेळगाव जिल्हा शाखेच्यावतीने काढण्यात आलेल्या आजच्या या मोर्चात शहरासह जिल्ह्यातील बहुसंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते अर्थ नग्न अवस्थेत निदर्शने करत जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेला हा मोर्चा सान्यांचे लक्ष वेधून घेत होता. केंद्र सरकार आणि राज्यातील भाजप व निजद नेत्यांच्या विरोधात कर्नाटक राज्य दलित संघर्ष समितीचे जिल्हा संचालक श्रीकांत तळवार संघटना संचालक संजय तळवळकर, कलाप्पा कांबळे, अमीन जातगार, रवी कांबळे, अनिल मोहिते आदींच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चाची जिल्हाधिकारी कार्यालयावर आज सांगता झाली. त्या ठिकाणी जिल्हाधिका-यांना निवेदन सादर करण्यात आले.
याप्रसंगी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना कर्नाटक राज्य दलित संघर्ष समितीचे बेळगाव संचालक संजय तळवळकर म्हणाले की, केंद्र सरकार देशातील सीबीआय, ईडी, प्रसिद्धी माध्यम, आयकर विभाग वगैरे ज्या संविधानिक संस्था आहेत त्यांचा दुरुपयोग करत आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी कर्नाटक राज्यात लोकशाहीमध्ये लोकांकडून निवडून आलेले १३६ आमदाराच्या पाठिंबावर या राज्याचे मुख्यमंत्री झालेले माननीय सिद्धरामय्या यांच्या विरोधात निधर्मी जनता दल आणि भारतीय जनता पक्षाचे नेते कुटील कारस्थान करत आहेत. षडयंत्र रचून त्यांना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचण्याचा प्रयत्न हे लोक करत आहेत. याच्या निषेधार्थ आमचे राज्याचे अध्यक्ष डॉ. डी. जी. सागर आणि जिल्हाध्यक्ष श्रीकांत तळवार यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही हा अर्थ नाम मोर्चा काढला आहे.