त्या मृतदेहांवर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार
दोन बेवारस मृतदेहांवर अंतिम संस्कार करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न सामाजिक कार्यकर्ते गंगाधर पाटील यांनी जपली आहे. त्यांनी नुकत्याच दोन मृतदेहांवर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले आहे.
जिल्हा रुग्णालयात एका अनाथ रुग्णाचा मृत्यू झाल्याचे गंगाधर पाटील यांना समजले यावेळी त्यांनी त्या मृतदेहांवर अंतिम संस्कार केले.
त्याचबरोबर काकती येथे वास्तव असलेल्या पश्चिम बंगालमधील एका गरीब माणसावर सुद्धा त्यांनी अंत्यसंस्कार केले आहे तो आपल्या पत्नीसह सुतार म्हणून काकती येथे राहत होता.
आजारपणामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू झाला त्याचे पार्थिव बिहारला नेण्यासाठी त्याच्या पत्नीकडे पैसे नव्हते त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी मदतीचा हात पुढे करत तिच्या पतीचा अंत्यसंस्कार हिंदू रित्विवाजाप्रमाणे सदाशिवनगर स्मशानभूमी मध्ये केले.