सर्वात मोठा आगमन सोहळा ! बेळगावच्या राज्याचे
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. बेळगाव परिसरात सार्वजनिक गणेशोत्सव उत्सव मंडळांच्या मूर्तीचे आगमन सोहळा आयोजन करण्यात येत आहे.. या आगमन सोहळ्यात सर्वांना वेध लागले असते बेळगावचा राजाचे आगमन सोहळ्याची. विशेष म्हणजे, चव्हाट गल्लीचा बाप्पा हा बेळगावचा राजा म्हणून ओळखला जातो. या सोहळ्याला दरवर्षी हजारो गणेश भक्तांची उपस्थिती असते. ढोल-ताश्याच्या गजरांमध्ये आणि भक्तांच्या जयघोषामध्ये हा सोहळा पार पडतो. त्यामुळे हा सोहळा सीमाभागातील गणेशोत्सवाची वेगळी ओळख झाला आहे.
चवाट गल्लीतील भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या बेळगावचा राजा या वर्षीचा आगमन सोहळा रविवारी 1 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 4:00 वाजता धर्मवीर संभाजीराजे चौक
बेळगाव येथून होणार असून याची उत्सुकता बेळगावचा राजाच्या भक्तांना लागून राहिली आहे.
मूर्तिकार रवी लोहार यांच्या संकल्पनेतून बेळगावचा राजा साकार होत आहे. यावर्षीच्या आगमन सोहळ्यात शिवशंभू ढोल तशा पथक, धाडस ढोल,झुंज ढोल,ब्राम्हनाथ ढोल ताशा,वर्जनाथ ढोल ताशा पथक असे बेळगावच्या राज्याला यांचे वादन होणार आहे. आगमन सोहळ्याचे अजून एक आकर्षण म्हणजे लाईट्स आहेत.तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहून आगमन सोहळ्याचा आनंद घ्यावा असे आवाहन बेळगावचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.