हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाजवळ महाराष्ट्र एकीकरण समितीने सीमालढ्यात बलिदान झालेल्या वीरांसाठी स्मृती भवन बांधण्याची नियोजन करण्यात आले आहे. गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या भवनाचा भूमिपूजन कार्यक्रम पार पडला. समितीने सीमावादात प्राणत्याग केलेल्या हुतात्म्यांच्या स्मृतीला वंदन करण्यासोबतच, त्या संघर्षाचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने भवन बांधण्याचे ठरवले आहे.
भूमिपूजन समितीचे नेते आर.एम. चौगुले दाम्पत्याने विधीपूर्वक पूजा केली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते गुढीपूजन संपन्न झाले. या प्रसंगी माजी आमदार व तालुका समितीचे अध्यक्ष मनोहर किणेकर यांनी स्पष्ट केले की, “१ जून १९८६ रोजी हिंडलगा, सुळगा, उचगाव आणि बेळगुंदी भागातील ९ हुतात्म्यांनी सीमालढ्यात बलिदान दिले. या संघर्षाचा इतिहास चित्रांद्वारे समजावून सांगणारे स्मृती भवन उभारण्यात येईल.”
माजी महापौर मालोजीराव अष्टेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. आर. एम. चौगुले यांनी सांगितले, “या भूमीवर सीमा संघर्षात अनेकांनी बलिदान दिले. त्यांचा इतिहास जपण्याचा आमचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.” https://dmedia24.com/the-town-of-the-city/
या कार्यक्रमात समितीनेते रमाकांत कोंडूस्कर, मदन बामणे, सरस्वती पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते. सर्वांनी हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली व स्मृती भवनाच्या निर्मितीला पाठिंबा व्यक्त केला.