बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेला कोट्यावधीचा गंडा.
शेतकऱ्यांच्या नावे बनावट कागदपत्रे बनवून बँकेला कोट्यावधी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी केआयएडीबी व्यवस्थापक, लिपिक आणि त्याच्या मुलास सीआयडी अधिकाऱ्यांनी अटक केली. महादेवप्पा सिम्पी उर्फ एम. के. सिम्पी, वरिष्ठ सहाय्यक शंकर तळवार, एजंट अश्पाक दुंडसी अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.
बनावट कागदपत्रांच्या आधारे या तिघांनी बँकेची ६४ लाख रुपयांची फसवणूक केली. जनजागृती संघाचे अध्यक्ष बसवराज कोरव यांनी मुख्यमंत्री आणि लोकायुक्तांकडे तक्रार करून या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी केली होती.