**३१ वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन कराड येथे संपन्न होणार**
**लोकनेते शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन**
कराड :
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित ३१ वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन येत्या ९ व १० मे २०२५ रोजी कराड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह (वातानुकूलित) येथे मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. या संमेलनाचे उद्घाटन मा. लोकनेते शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती परिषदचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांनी दिली.
या संमेलनात देशभरातील नवोदित मराठी कवींना आपल्या कवितेला व्यासपीठ मिळणार असून, कविसंमेलनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नवोदित कवींनी त्वरित नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. नोंदणी शुल्क ५०० रुपये असून, ते 9422300362 या PhonePe क्रमांकावर भरून, स्क्रीनशॉट आयोजकांना पाठवावा लागेल.https://dmedia24.com/traditional-bike-rally-in-the-city/
साहित्य संमेलनासाठी निवास व्यवस्था, महिलांसाठी स्वतंत्र निवास, तसेच नाश्ता व भोजन आदी सुविधा करण्यात आल्या आहेत. सहभागी सर्व कवींना स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
कर्नाटक राज्यातील बेळगाव सीमाभागातील नवोदित कवींनी GPay किंवा PhonePe द्वारे 9591929325 या क्रमांकावर शुल्क भरून आपली नोंदणी करावी, असे आवाहन राज्याध्यक्ष सीमाकवी रवींद्र पाटील यांनी केले आहे.