बेळगाव:जिल्ह्यातील बसवन कुडची गावात यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या आंबिलगाडा मिरवणुकी दरम्यान एक दुःखद घटना घडली. मिरवणुकीत सहभागी झालेल्या पारीश पाटील (वय २७) नावाच्या तरुणावर वाहनाचे चाक चढल्याने तो गंभीररीत्या जखमी झाला होता. घटना बेळगाव शहराजवळ घडून आल्यानंतर जखमी तरुणाला खासगी रुग्णालयात हलण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्याचा प्राण वाचवणे शक्य झाले नाही. उपचाराच्या कालावधीतच त्याचा मृत्यू झाल्याने गावात शोकाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या अपघातानंतर स्थानिक समुदायात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत तरुणाच्या कुटुंबियांसह गावकऱ्यांनी या घटनेवर दुःख आणि नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, या प्रकरणी माळमारुती पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.