तिसरा रेल्वे गेट उड्डाणपुलाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून तात्पुरता दिलासा
बेळगाव:निर्मितीच्या कालावधीपासून समस्यांच्या गर्तेत सापडलेला थर्ड गेट रेल्वे उड्डाणपूल सातत्याने वादाचा विषय ठरला आहे. सततच्या पावसामुळे या उड्डाणपुलावर भले मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे येथील वाहतूक धोकादायक तर बनली आहेच . त्याचबरोबर नागरिकांना येथून ये जा करणे मुश्किल होत आहे. त्यामुळे अनेक जण या उड्डाणपुलाचा वापर
टाळत आहेत .
मात्र उड्डाणपुलाच्या खालील तिसरे रेल्वे गेट बंद केले असल्यामुळे नागरिकांना दुसरा पर्याय देखील उपलब्ध नाही. अशा स्थितीत खडकाळ अवस्थेतील या उड्डाणपूलावर पडलेल्या खड्ड्यांबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी जागृती केली होती. त्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी तातडीने या ठिकाणी भेट देऊन सदर उड्डाणपूलावरील खड्डे बुजविण्यासाठी सूचना केली. त्यामुळे आता नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.