बालवीर विद्यानिकेतनच्या उन्हाळी शिबिराची सांगता
बेळगुंदी येथील बालवीर सोशल फाउंडेशन संचलित बालवीर विद्यानिकेतन बेळगुंदी शाळेमध्ये 15 दिवशीय उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्या शिबिराची सांगता बालवीर सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष मा श्री प्रेमानंद गुरव सर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून योग विद्याधामचे सर्वेसर्वा श्री रामजी गडगाणे, अध्यक्ष गिरीश तेंडुलकर, सेक्रेटरी श्री दीपक गोजगेकर , योगशिक्षक अच्युत माहुली , खजिनदार श्री सुनील चौगुले, श्री श्रीकांत प्रभू, श्री सचिन पाटील ,आय आर एस अधिकारी आकाश चौगुले, उद्योजक श्री प्रकाश पाटील , बालवीर विद्यानिकेतनचे संयोजक श्री शंकर चौगुले सर, सेक्रेटरी पि. के हदगल, अर्जुन चौगुले, माध्यमिक विभाग प्रमुख मंगल पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते प्रारंभी कुंडीतील रोपट्याला पाणी घालून शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर शाळेतील ताईंनी शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रेखा शहापूरकर यांनी प्रास्ताविक भाषणातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला वैभवी मोरे व रणवीर गावडा या विद्यार्थ्यांनी उन्हाळी शिबिराबद्दल आपली मनोगते व्यक्त केली त्यानंतर डी. डी. बेळगावकर सरांनी शाळेचा सुरुवातीपासून ते आजपर्यंतच्या प्रवासाचा आढावा सादर केला. शिवकन्या साक्षी गोरल व साईतेज सारंगी यांनी शिवाजी महाराजांची यशोगाथा आपल्या भाषणातून व्यक्त केली त्यानंतर विद्यार्थ्यांनी योगाची प्रात्यक्षिके सादर केली कार्यक्रमाला बालवीर फौंडेशनचे संचालक राजू मुजावर, परशराम झंगरूचे, पुंडलिक सुतार, दशरथ पाऊसकर, सुनील जाधव यासह योग विद्याधामचे सादक, पालक, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद गावडे यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत व परिचय सिद्धेश्वर तुर्केवाडकर यांनी केले तर आभार भाग्यश्री कदम यांनी मानले