*अंधारात पिचत पडलेल्या बहुजन समाजाला हाती शिक्षणाची ज्योत दिली : तंत्रशिक्षण आणि उन्नत शिक्षण आयएएस अधिकारी कमिशनर के. एम. सुरेशकुमार*
*विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा पाया भक्कम करायला हवा तर विकासाला मिळते बळ : तंत्रशिक्षण आणि उन्नत शिक्षण आयएएस अधिकारी कमिशनर के. एम. सुरेशकुमार*
*बेळगाव जिल्हा चलवादी महासभा व अखिल भारतीय प्रगतिशील एल्गार सामाजिक साहित्य परिषद बहुउद्देशीय संस्थेतर्फे व्याख्यान – चर्चासत्र आणि सत्कार सोहळा संपन्न
बेळगांव, तारीख 06 ऑक्टोबर 2023 : शिक्षणाने माणूस विचार करू लागतो स्वतःच्या हक्कांसाठी बोलू शकतो, अन्यायाला वाचा फोडू शकतो पर्यायाने त्याच्या विकासाचा पाया पक्का होतोच शिक्षण अर्धवट सोडून दिलेली व्यक्ती आयुष्यभर न्यूनगंडाची शिकार होते, मग ती स्त्री असो अथवा पुरूष. शिक्षणाने अर्थार्जनाचे साधन तर उपलब्ध होतेच परंतू माणसाचा सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. शिक्षण माणसाला काय देते? आत्मसन्मान,स्वाभिमान,विचार करण्याची ताकद ,विशिष्ट विचार घेऊन जगण्याची ताकद,स्वावलंबन,अन्यायाला विरोध करण्याची ताकद,सत्याला सामोरं जाण्याची ताकद,हे सगळं देते ते शिक्षण!आणि लौकिकार्थाने शाळा शिकूनही आपल्यात वरील बाबींचा विकास झाला नसेल तर त्याने शिक्षण घेतलेच नाही,असे खेदाने म्हणावे लागेल. कारण शिक्षण हे फक्त उदरनिर्वाहाचे साधन नाही तर ते संपूर्ण जीवनाच्या विकासाचे साधन आहे. माणसाला माणूसपण प्राप्त करुन देते ते शिक्षण! माणसाच्या मन,मेंदू आणि मनगटाचा विकास करते ते शिक्षण! माणसाला उच्चपदापर्यंत पोहोचविण्याचे काम करते ते शिक्षण!डॉ. बाबासाहेब आंबेडकर,कर्मवीर भाऊराव पाटील,महर्षी कर्वे, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले दांपत्य, राजर्षी शाहू महाराज , विठ्ठल रामजी शिंदे, या थोरामोठ्यांनी शिक्षणाचे महत्व ओळखले होते म्हणूनच त्यानी आपापल्या परीने आधी सर्वांच्या शिक्षणासाठी अतोनात प्रयत्न केले.जीवन विकासाचे साधन
जीवनात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्व आहे.नव्हे नव्हे मानवी जीवनाची शिक्षण ही मूलभूत गरज आहे. शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे . आपण प्रत्येक टप्प्यावर शिकत असतो म्हणून आपण सर्वानी शिक्षणाचे पावित्र्य जपायला हवे.
शिक्षण म्हणजे समाज परिवर्तनाचे साधन होय शिक्षणामुळे व्यक्तीचे चारित्र्य
निकोप घडत असते.शिक्षक विद्यार्थ्यांना तळमळीने शिक्षण देत असतात त्यामुळेच विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळते.जीवन जगत असताना आपण कस वागाव हे शिक्षणामुळेच कळते.शिक्षणामुळे आयुष्य समृद्ध होते.शिक्षण हे दोन प्रकारचे असते.आपली आपल्याला ओळख करुन देते ते एक शिक्षण आणि दुसरे तंत्रज्ञान . सर्वांवर निरपेक्ष प्रेम करणे शिक्षणामुळेच शक्य आहे. शिक्षणामुळे मानवाचा सार्वागिंण विकास होतो व मानवाचा विकास झाल्यास देशाचा विकास होतो.हे आंबेडकर म.फुलेनी जाणले होते म्हणुन त्यानी तळागाळातील लोकांना शिक्षण दिले पाहिजे ,शिक्षणापासुन कोणीही वंचित राहू नये म्हणुन त्यांनी पिपल्स एजुकेशन सोसायटी स्थापन केली.म्हणजेच मानवी जीवनात खर्या अर्थाने चांगली क्रांती घडविण्याचे काम केवळ शिक्षणच करु शकते आणि म्हणुन आता शिक्षणाचा विचार नुसता देशाच्या नाही तर जगाच्या केंद्र स्थानी येऊ पहातोय.युनेस्कोच्या 195 सदस्यानी एकत्रित येऊन सर्वासाठी शिक्षण हे मान्य करणं काही विशेष नाही, परंतु 1800व्या शतकात अज्ञानाच्या अंधारात पिचत पडलेला बहुजन समाज पाहुन ज्योतीरावांचे मन हेलावले आणि त्यांनी समाजाचा विरोध पत्करुन व छळ सोसुन शिक्षणाचा दीप तेवत ठेवला आणि शिक्षणाला अग्रक्रम दिला आहे. असे प्रतिपादन *कर्नाटक सरकारचे सहसंचालक (प्रशासन) आणि प्रभारी संचालक, तंत्रशिक्षण आणि उन्नत शिक्षण विभाग, बंगलोरचे आयएएस अधिकारी कमिशनर के. एम. सुरेशकुमार यांचे *जीवनात अनन्यसाधारण महत्व आणि समाज परिवर्तनाचे साधन म्हणजे शिक्षण : आजचा बदलता काळ* या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
*बेळगाव जिल्हा चलवादी महासभा बेळगाव शाखा आणि अखिल भारतीय प्रगतिशील एल्गार सामाजिक साहित्य परिषद बहुउद्देशीय संस्था बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष व्याख्यान – चर्चासत्र आणि सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.* *कर्नाटक सरकारचे सहसंचालक (प्रशासन) आणि प्रभारी संचालक, तंत्रशिक्षण आणि उन्नत शिक्षण विभाग, बंगलोरचे आयएएस अधिकारी कमिशनर के. एम. सुरेशकुमार यांचे “”जीवनात अनन्यसाधारण महत्व आणि समाज परिवर्तनाचे साधन म्हणजे शिक्षण : आजचा बदलता काळ*”” या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन व्हिटीयू येथील गेस्ट हाऊस येथे करण्यात आले होते.
*कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेळगाव जिल्हा महासभा बेळगाव शाखेचे अध्यक्ष, समाजसेवक श्री दुर्गेश गोविंद मेत्री होते.*
प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ समाजसेवक आणि माजी नगरसेवक अनिल पाटील आणि कर्नाटक सरकारचे सहसंचालक (प्रशासन) आणि प्रभारी संचालक, तंत्रशिक्षण आणि उन्नत शिक्षण विभाग, बंगलोरचे आयएएस अधिकारी कमिशनर के. एम. सुरेशकुमार *जीवनात अनन्यसाधारण महत्व आणि समाज परिवर्तनाचे साधन म्हणजे शिक्षण : आजचा बदलता काळ* या विषयावर विशेष व्याख्यानात प्रमुख वक्ते आणि मार्गदर्शक लाभले होते; प्रारंभी प्रमुख मान्यवरांचे दोन्ही संस्थांच्या वतीने विशेष शाल श्रीफळ हार तुरा फेटा पुष्पगुच्छ तसेच विशेष बेळगाव कुंदा भेट देऊन सत्कार करण्यात आला.
स्वागत चलवादी महासभा बेळगाव तालुकाध्यक्ष *परशराम कांबळे* यांनी केले. प्रास्ताविक कवी प्राध्यापक निलेश शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन तुकाराम मधले यांनी केले; तर चलवादी महासभा रायबाग तालुक्याचे *अध्यक्ष कुमार दरबारे* यांनी आभार मानले. यावेळी बेळगाव जिल्ह्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी सदस्य कर्मचारी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.