बेळगाव:तालुक्यातील कल्लेहोळ 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागत गीताने शालेय विद्यार्थ्यांनी केले. त्यानंतर डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन श्री मनोहर कित्तूर (माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष)यांच्या हस्ते करण्यात आले.
समारंभाचे अध्यक्षस्थानी श्री एम आर गाडेकर व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री भैरवनाथ आ चौगुले यांनी भूषविले होते.
स्वागत व प्रास्ताविक भाषण मुख्याध्यापक श्री बी.वी. पाटील यांनी केले. श्री भैरवनाथ चौगुले तसेच शाळा सुधारणा कमिटीचे सदस्य सदस्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
त्यानंतर एसडीएमसी व माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने शाळेतील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
श्री मनोहर कित्तूर यांनी शिक्षक दिनाविषयी आपले अनमोल असे विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एम एल भुतेवाडकर यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमती घाटगे यांनी केले.