*बालवीर विद्यानिकेतन येथे शिक्षक-पालक व संचालक मेळावा संपन्न*
बेळगुंदी येथील बालवीर विद्यानिकेतन शाळेने शिक्षक, पालक आणि संचालक यांचा मेळावा यशस्वीरित्या पार पाडला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर चर्चा, पालक-शिक्षक संवाद वाढवणे आणि शैक्षणिक धोरणांवर एकमत निर्माण करणे हे या मेळाव्याचे प्रमुख उद्देश होते.
कार्यक्रमाचा सुरुवात शिक्षकांच्या स्वागतगीताने झाल्यानंतर,बालवीर सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष प्रेमानंद गुरव यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. संस्थेचे संस्थापक डी.डी. बेळगावकर यांनी मुलांमधील मोबाइलच्या अतिनियमित वापरावर भाष्य करत पालकांना मुलांशी अधिक संवाद साधण्याचे आवाहन केले. त्यांनी मुलांच्या शिस्तबद्ध दिनचर्या, खेळ आणि अभ्यासात समतोल राखण्याची गरज स्पष्ट केली.
प्राध्यापक मय्याप्पा पाटील यांनी मातृभाषेत शिक्षणाचे महत्त्व रेखांकित करत म्हणाले “मराठीमध्ये प्राथमिक शिक्षण मिळाल्यास मुलांचा बौद्धिक विकास गतिमान होतो. पालकांनी स्वतः शिस्त पाळून मुलांसाठी आदर्श ठरवावे.” त्यांनी पालकांना मुलांना सकाळी लवकर उठण्याची सवय लावण्याचा सल्ला दिला.
संचालक मंडळाच्या प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी दूर करण्याचे आश्वासन दिले. पालकांनी शाळेच्या सुविधा विकासासाठी सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली.
आयकर अधिकारी आकाश चौगुले, शंकर चौगुले, सुभाष हदगल, गीता बेळगावकर, आनंदा जाधव इत्यादी गणमान्य व्यक्ती उपस्थित होत्या. शिक्षक, कर्मचारी आणि पालक यांच्या सहभागातील हा मेळावा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने एक पाऊल ठरला. https://dmedia24.com/free-health-camp-on-chawat-street/
“शिक्षक आणि पालक यांच्या सहकार्यातूनच मुलांची योग्य घडण शक्य आहे,”असे संस्थेने यावेळी संदेश दिला.