ताराराणीच्या कन्यांचा मॅरेथॉनमध्ये दमदार झंकार
खानापूर : महालक्ष्मी तोपिनकट्टी सोसायटी संचलित शांतिनिकेतन पब्लिक स्कूल आयोजित वार्षिक मॅरेथॉन स्पर्धेत ताराराणी हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी यंदाही आपले वर्चस्व सिद्ध केले.
3000 मीटर धावण्याच्या गटात प्रियंका रामचंद्र देवलतकर हिने प्रथम क्रमांक पटकावत आपली क्रीडाक्षमता दाखवून दिली. तिच्यासोबत अनुश्री ज्योतिबा अंधारे व भक्ती गणपती देवलतकर या दोघींनीही उत्तम कामगिरी करत विजेतेपदावर आपली छाप उमटवली.
या यशामागे संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा डॉ. श्रीमती राजश्री नागराजू यांचे प्रेरणादायी नेतृत्व, संचालक मंडळातील ज्येष्ठ मार्गदर्शक श्री शिवाजीराव पाटील व श्री परशुराम अण्णा गुरव यांचे पाठबळ, तसेच शाळेचे मुख्याध्यापक राहुल एन. जाधव, ताराराणी पीयू कॉलेजचे प्राचार्य श्री ए. एल. पाटील, क्रीडाशिक्षिका सौ. अश्विनी टी. पाटील व शिंदे सर यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले.
या यशामुळे संपूर्ण खानापूर तालुक्यात विद्यार्थिनींचा गौरव होत असून, तरुण पिढीला प्रोत्साहन मिळत आहे.