रिंग रोड संदर्भात तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक
बेळगाव: तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सोमवारी दिनांक (०२/०१/२०२३) मराठा मंदिर येथे रिंग रोड संदर्भात बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीमध्ये अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच काही ठराव ही मांडण्यात आले.
त्यामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या गावामधील पंचायतीसमोर आंदोलन छेडणे . रिंग रोड विरोधात तीव्र आंदोलन छेडणे त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना शेतकऱ्यांनी पत्रव्यवहार करणे. त्याचबरोबर राजमाता जिजाऊ जयंती निमित्त युवा व महिलांसाठी मेळाव्याचे आयोजन करणे असे ठराव या बैठकीत मांडण्यात आले.
त्यानंतर हिवाळी अधिवेशनामध्ये बेळगावच्या 4 ही आमदारांनी रिंग रोड संदर्भात कोणतीही चर्चा केली नाही यासंदर्भात 4 ही आमदारांचा निषेध ही व्यक्त करण्यात आला.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मनोहर किनीकर तसेच माजी महापौर शिवाजी सेंड कर एम जे पाटील माजी जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील वकील सुधीर चव्हाण मनोज पावशे ते व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आपली मते मांडली वकील सुधीर चव्हाण ,अनिल पाटील ,भागोजी पाटील ,,प्रकाश अष्टेकर ,,डॉ नितीन राजगुळकर ,रामचंद्र मोदगेकर, शंकर चौगुले यांनी रिंग रोड संदर्भात आपले विचार व्यक्त केले.