भगवान श्रीरामाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा
भगवान श्री रामाबद्दल आणि राम चरित मानस बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे.या मागणीचे निवेदन हिंदू जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले.प्रभू रामचंद्रांचा अवमान कधीही सहन केला जाणार नाही असा इशाराही हिंदू जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिला.
कर्नाटकातील लेखक के.भगवान यांनी प्रभू रामचंद्रांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. तर राम चरित मानसबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य बिहारचे शिक्षण मंत्री चंद्रशेखर आणि उत्तर प्रदेशचे समाजवादी पक्षाचे नेते स्वामिप्रसाद मौर्य यांनी केले आहे.या तिघांचाही हिंदू जनजागृती समितीने निषेध करून जोरदार घोषणाबाजी केली.श्रीराम आणि रामचरित मानस याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांना त्वरित अटक करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
यावेळी श्री. रवि कोकीतकर, श्री. पंकज घाडी, श्री. मल्लिकार्जुन गुडगी, श्री. विजय होंडाड, श्री. सदानंद मासेकर, सौ. आक्काताई सुतार, सौ. मिलन पवार, श्री.काशिनाथ शेट्टी, श्री. हृषिकेश गुर्जर, श्री. सुधीर हेरेकर, सौ. उज्वला गावडे, सविता बोंगले उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांच्या अनुपस्थित शिरस्तेदार श्री परगी यांच्या माध्यमातून निवेदन स्वीकारले.