मराठा युवक संघ आयोजित जलतरण स्पर्धेचा समारोप
बेळगाव : मराठा युवक संघ आयोजित 19 वी आंतरराज्य आंतरशालेय जलतरण स्पर्धा आबा क्लब व हिंद सोशल क्लब यांच्या सहकार्याने करण्यात आलेल्या स्पर्धेचा बक्षिस समारंभाचे प्रमुख पाहुणे माजी विधान परिषद सदस्य व केएलई संस्थेचे संचालक महांतेश कवटगीमठ उपस्थित होते.
प्रारंभी सुहास किल्लेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संस्थेची माहिती मराठा युवक संघाचे अध्यक्ष बाबासाहेब काकतकर यांनी प्रास्ताविकात मराठा युवक संघ गेली 58 वर्षे बेळगावात आयोजित करत होती परंतु किल्ला तलावातील पाणी गढूळ झाल्याने त्या स्पर्धा बंद करून आता गत 18 वर्षे शहरातील स्विमिंग पूलमध्ये घेण्यात येत आहेत असे सांगितले.
महांतेश कवटगीमठ यांनी मराठा युवक संघाचे व आबा स्पोर्ट्स क्लब व सर्व जलतरण पटुंचे अभिनंदन केले. स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकातील 300 ते 400 स्पर्धक भाग घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले. बेळगांव शहर हे क्रीडापटू शहर बनत आहे असेही सांगितले.
स्पध्रेतील वैयक्तिक चॅम्पियनशिप बक्षीस वितरण शेखर हंडे, सुहास किल्लेकर, पांडुरंग जाधव, दिनकर घोरपडे, मधू पाटील, विजय बोंगाळे, मारुती देवगेकर यांच्याहस्ते देण्यात आले.
जनरल चॅम्पियनशिप चषक मुलांमध्ये सेंट पाॅल हायस्कूल व मुलींमध्ये सेंट जोसेफ हायस्कूल यांना पाहुणे माजी विधान परिषद सदस्य व केएलई संस्थेचे संचालक महांतेश कवटगीमठ व बाळासाहेब काकतकर यांच्याहस्ते देण्यात आला.
स्पर्धेचे सूत्रसंचालन आबा क्लबचे विश्वास पवार तसेच आभार प्रदर्शन शेखर हंडे यांनी केले.