This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

January 2025
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsSports

*बेळगावच्या जलतरणपटूंनी घवघवीत यश केले संपादन*

*बेळगावच्या जलतरणपटूंनी घवघवीत यश केले संपादन*
D Media 24

बेळगावच्या जलतरणपटूंनी घवघवीत यश केले संपादन

कोल्हापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या वीर सावरकर जलतरण चषक -2023 या प्रतिष्ठेच्या जलतरण स्पर्धेत स्वीमर्स क्लब बेळगाव आणि एक्वेरियस क्लब बेळगावच्या जलतरणपटूंनी घवघवीत यश संपादन केले आहे .

सदर स्पर्धेचे 8 जुलै रोजी कुरुकली, कोल्हापूर येथील भोगावती कॉलेजच्या राजश्री शाहू स्विमिंग पूलमध्ये वीर सावरकर जलतरण चषक -2023 या प्रतिष्ठेच्या जलतरण स्पर्धेचे आयोजन केले होते.

यावेळी या स्पर्धेत बेळगावच्या सार्थक श्रेयेकर याने 7 सुवर्ण आणि 1 कांस्यपदक संपादन करत “मॅन ऑफ द कॉम्पिटिशन” किताब हस्तगत केला आहे.तसेच सदर स्पर्धेत बेळगावच्या जलतरणपटूंनी घवघवीत यश मिळविले असल्याने सर्वांचे कौतुक करण्यात येत आहे .

या स्पर्धेत सार्थक श्रेयकर -7 सुवर्ण, 1 कांस्य पदक. पाखी हलगेकर -4 सुवर्ण पदकं. यशराज पावशे -3 सुवर्ण, 2 कांस्य पदकं. अनिश पै -2 सुवर्ण, 5 रौप्य पदकं. अनन्या पै -1 सुवर्ण, 4 रौप्य, 2 कास्यं पदकं. अहीका हलगेकर -4 रौप्य, 1 कांस्य पदक. भगतसिंग गावडे -4 रौप्य पदकं. स्कंद घाडगे 3 कांस्य पदकं. तन्वी पै -1 कांस्य पदक प्राप्त केले आहेत .

यांना जलतरण प्रशिक्षक उमेश कलघटगी, अक्षय शेरीगार, अजिंक्य मेंडके, नितेश कुडूचकर, गोवर्धन काकतकर व इमरान उचगावकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे .


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply