भारत विकास परिषदेतर्फे स्वामी विवेकानंद जयंती
अपूर्व उत्साहात साजरी
भारत विकास परिषदेतर्फे स्वामी विवेकानंद जयंती रविवारी सायंकाळी जीजीसी सभागृहात अपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली. प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत सहव्यवस्था प्रमुख कृष्णानंद कामत व राष्ट्रसेविका समिती नगर कार्यवाहिका विद्या जोशी उपस्थित होत्या.
प्रारंभी स्वामी विवेकानंद आणि भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजा करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर सामूहिक संपूर्ण वंदे मातरम प्रस्तुत करण्यात आले. परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य पांडुरंग नायक यांनी अतिथींची ओळख करून दिली. अध्यक्ष विनायक मोरे यांच्या हस्ते अतिथींना सन्मानीत करण्यात आले. प्रांत अध्यक्ष स्वाती घोडेकर यांनी भारत विकास परिषदेविषयी माहिती दिली.
त्यानंतर कृष्णानंद कामत यांचे स्वामी विवेकानंद आणि राष्ट्रभक्ती याविषयी बौद्धिक झाले. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य, ध्येयधोरणे आणि उद्दिष्टे याबाबत त्यांनी विस्तृतपणे विवेचन केले. विद्या जोशी यांनी विविध शारीरिक कसरती आणि बौद्धिक खेळ घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुखद देशपांडे यांनी केले. सचिव के. व्ही. प्रभू यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्राचार्य व्ही. एन्. जोशी, एन्. बी. देशपांडे, विनायक घोडेकर, सुभाष मिराशी, कुमार पाटील, रामचंद्र तिगडी, जयंत जोशी, गणपती भुजगुरव, पी. एम्. पाटील, कॅ. प्राणेश कुलकर्णी, पी. जे. घाडी, किशोर काकडे, मधुकर सामंत , सुधन्व पुजार, जया जोशी, विद्या इटी, शुभांगी मिराशी, योगिता हिरेमठ, प्रिया पाटील, पूजा पाटील, उषा देशपांडे, लक्ष्मी तिगडी, ज्योती प्रभू, अक्षता मोरे, ज्योत्स्ना गिलबिले, शालिनी नायक आदी उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.