मुख्याध्यापक निलंबित
बेळगाव , प्रतिनिधी:
शाळा बंद ठेवून आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने गट शिक्षण अधिकारी शहर विभाग यांनी कचेरी गल्ली , शहापूर येथील सरकारी उच्च प्राथमिक कन्नड शाळा क्रमांक 8 च्या मुख्याध्यापकांना सेवेतून निलंबित केले आहे.
कर्नाटक राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेच्या जिल्हा आणि शहर विभागाच्या वतीने राणी चन्नम्मा सेवा रत्न पुरस्कारा वितरणाचे आयोजन महिला दिनाच्या निमित्ताने करण्यात आले होते. शालेय शिक्षण खाते बेळगाव विभाग यांनी शाळा बंद न ठेवता शाळा नियमितपणे सुरू ठेवाव्यात. शाळेत शिक्षकांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावे , अशा सूचना देखील शिक्षण खात्याच्या वतीने संबंधित शाळांना देण्यात आल्या होत्या. मात्र शिक्षण खात्याच्या या सूचनेकडे संबंधित शाळेच्या सर्व शिक्षकांनी दुर्लक्ष केले. त्या दिवशी शाळेला कुलूप लावून शाळा बंद ठेवण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. याला जबाबदार धरून गटशिक्षण अधिकाऱ्यांनी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना सेवेतून निलंबित केल्याचे कळविले आहे.https://dmedia24.com/free-health-camp-on-chawat-street/
शिक्षण खात्याच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून शाळा बंद ठेवल्याने पालक वर्ग आणि विद्यार्थ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शाळा बंद ठेवल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असून याला त्या शाळेचा शिक्षक वर्ग जबाबदार असल्याचे पालक वर्गातून बोलले जात आहे. यापुढे तरी शिक्षक वर्गाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची खबरदारी घ्यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.