हिवाळी अधिवेशन काळात होणाऱ्या मराठा समाजाच्या मेळाव्या करिता कंग्राळी खुर्द येथून पाठिंबा
हिवाळी अधिवेशन काळात बेळगाव मध्ये होणाऱ्या मराठा समाजाच्या मेळाव्या करिता अनेक ठिकाणाहून पाठिंबा दर्शविण्यात येत आहे .येथील कंग्राळी खुर्द गावाचा मेळाव्याला पाठिंबा असल्याचे दर्शविण्यात आले आहे
कर्नाटकातील समस्त मराठा समाजाला 3 बी मधून 2 या मध्ये आरक्षण मिळण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे .तसेच 20 डिसेंबर रोजी होणाऱ्या मराठा मेळाव्याला ग्रामपंचायत सदस्य व मराठा समाजाचे कलाप्पा पाटील यांनी जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.
यावेळी पश्चिम बेळगाव मराठा समाजाचे विनय विलास कदम, मराठा संघटनेचे नारायणराव जंगरूचे, क्षत्रिय मराठा फेडरेशन कर्नाटकचे बेळगाव जिल्ह्याचे उपाध्यक्ष महेश रेडेकर , संजय पाटील, मराठा समाजाचे दिनेश पाटील, प्रवीण पाटील, मनोहर भुक्क्याळकर, अमोल जाधव, खाचू सुखये , मोनाप्पा भास्कर, श्री प्रशांत नगोजी पाटील , श्री. सोमनाथ नाथा पाटील, श्री नाना पाटील, कलाप्पा काशीराम पाटील, श्री अमोल पाटील, एस एन बॉईज ज्योती नगर , एन. जी. बॉईज नारायण गल्ली, पाटील गल्ली बॉईज व महादेव रोड येथील समस्त नागरिक बेळगाव जिल्हा कुस्ती संघटनेचे अध्यक्ष हनुमंत गुरव व ग्रामस्थ उपस्थित होते…