संडे ठरला अनलकी
दुबई:
भारतीय क्रिकेटसाठी 8 डिसेंबर रविवार हा दिवस पुरुष कनिष्ठ आणि वरिष्ठ संघासाठी अनलकी ठरला. ॲडलेट येथे भारतीय पुरुष वरिष्ठ संघाचा तर दुबई येथे 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत कनिष्ठ पुरुष भारतीय संघ या दोन्ही संघांचा एकतर्फी पराभव झाला. त्यामुळे भारतीय क्रिकेट शौकिनांची निराशा झाली.
बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 198 धावा केल्या. बांगलादेश कडून रिझान हुसेन याने सर्वाधिक 47, शिहाबन याने 40, फरीद हसन याने 39 , कर्णधार अझीझूल हकीम तमिम याने 16 धावांचे योगदान दिले.
199 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाच्या डावाची सुरुवात खराब झाली.
सलामीवीर आयुष म्हात्रे केवळ एक धाव करून तंबूत परतला. दुसरा सलामीवीर आणि पूर्ण बहरात असलेला तेरा वर्षाचा बिहारचा अष्टपैलू वैभव सूर्यवंशी चमक दाखवू शकला नाही त्याने फक्त नऊ धावा केल्या. भारताकडून कर्णधार मोहम्मद अमान याने सर्वाधिक 26, हार्दिक राज याने 24, कार्तिकेय यांनी 21 , सिद्धार्थ याने 20 धावांचे योगदान दिले. बाकी अन्य कोणताही फलंदाज तग धरू शकला नाही. अशा पद्धतीने भारताचा डाव सर्वबाद 139 धावांवर आटोपला. बांगलादेश ने 59 धावांनी भारतावर मात करून वर्ल्डकप उंचावला. त्यामुळेच भारतीय क्रिकेट शौकीनांसाठी 8 डिसेंबरचा रविवार अनलकी ठरला.