11 एप्रिल पासून उन्हाळी सुट्टीला सुरुवात
बेळगाव :शिक्षण खात्याकडून यंदा पाचवी व आठवीच्या बोर्ड परीक्षा घेण्यात येत आहेत. शनिवार दिनांक १ एप्रिल ला या परीक्षेची सांगता होणार आहे. यापूर्वी पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षा घेण्यात आल्या आहेत. दहावीच्या मुलांचा निकाल वगळता प्राथमिक व माध्यमिक शाळांचे निकाल 10 एप्रिलला जाहीर होणार आहेत.
11 एप्रिल पासून उन्हाळी सुट्टी सुरू होणार आहे. 29 मे पासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे. दहावी परीक्षेच्या तोंडावर शिक्षण खात्याने पाचवी व आठवीची बोर्ड परीक्षा घेण्यासाठी वेळापत्रक जाहीर केले. मात्र शिक्षकातून नाराजी व्यक्त होत होती.
दहावीच्या परीक्षेच्या काळात पाचवी व आठवीच्या बोर्ड परीक्षा घेणे चुकीचे असून बोर्डाची परीक्षा लवकर घेणे आवश्यक होते असे मत व्यक्त करण्यात आले .पाचवी व आठवीची परीक्षा 27 मार्चपासून सुरू झाली असून आज शनिवारी दिनांक 1 एप्रिल रोजी सांगता होणार आहे.
10 एप्रिल रोजी निकाल जाहीर होणार असून पेपर तपासणीचे काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत .11 एप्रिल पासून उन्हाळी सुट्टीला सुरुवात होणार आहे.