किल्ल्यातील रामकृष्ण मिशन आश्रमतर्फे विद्यार्थ्यांच्यासाठी उन्हाळी शिबिराचे आयोजन केले आहे. उन्हाळी शिबीर हे खास करून प्राथमिक आणि माध्यमिक विद्यार्थी आणि विधार्थीनीसाठी आहे. शिबिरात व्यक्तिमत्व विकास, शिस्तीचे महत्व, भारताचा सांस्कृतिक इतिहास, देशभक्ती, गुरुचे महत्व,प्रार्थना, ध्यान, भजन,भगवदगीता, श्लोक, विविध प्रकारचे खेळ शिबिरार्थीना शिकवले जाणार आहेत.
मुलींची पहिली बॅच ११ एप्रिल पासून सुरु होणार आहे तर मुलांची पहिली बॅच १८ एप्रिल पासून सुरु होणार आहे.https://dmedia24.com/traffic-congestion-for-more-than-3-hours-due-to-container-stuck-in-tilari-ghat/
शिबिरात सहभागी होण्यासाठी आश्रमात अगोदर नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी दूरधवनी क्रमांक : ९६३२००६६१, ९९१६९९७०३७ आणि ९८८६७७१०४७ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे रामकृष्ण मिशन आश्रम तर्फे कळविण्यात आले आहे.