भाचीतील कर्तबगार सुजाता गुंजीकरने देश सेवेत उमटविला आगळा ठसा
सीआरपीएफ मध्ये दहा ते अकरा वर्षापासून देशसेवेत कार्यरत नव्या तरुण-तरुणींसाठी आदर्श
बेळगाव मध्ये युतीच्या प्रशिक्षणासंदर्भात मोठी केंद्र उभे करून त्यांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देणे आज नितांत गरजेचे
महिला सक्षमीकरणासाठी पुढाकार घेतला गेला जावा.
21व्या शतकात पुरुषांबरोबरच महिलाही प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत आणि उमटवलेला आहे भारतीय सैन्य दलात अनेक मोठमोठ्या पदावर महिला कार्यरत आहेत त्यामध्ये बेळगाव परिसरतील अनेक महिलांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आहे. त्यामधीलच एक बेळगाव तालुक्याच्या भाची गावातील अतिशय गरीब आणि शेतकरी कुटुंबातून देशाच्या सेवेसाठी सुजाता लक्ष्मण गुंजकर यांचे आवर्जून नाव घ्यावे लागेल. बेळगाव पासून अवघ्या पंधरा किलोमीटरवर असणाऱ्या गावांमधून यांनी आपल्या गावचं आणि बेळगावच नाव उज्वल केलं आहे. https://dmedia24.com/dr-babasaheb-ambedkar-jubilee-prepare-meeting-on-sunday/
<span;>त्यांनी सीआरपीएफ दलामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कार्य केले आहे. केंद्रीय रिझर्व पोलीस दलात मणिपूर येथे हेड कॉन्स्टेबल रेडिओ ऑपरेटर म्हणून कार्य केले आहे. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या सुजाता यांचे परिसरात नेहमी कौतुक केले जाते. यांचे कार्य सर्व गरीब आणि शेतकरी कुटुंबातल्या मुलींना बळ देणारे आहे त्यांचे कार्य आदर्श देणारे आहे याचाच आदर्श घेऊन पुढे वाटचाल करण्याचा संदेश ही सुजाता यांनी दिला आहे.
<span;>गोरगरीब अतिशय कष्टकरी व शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आणि अतिशय कठीण परिस्थितीतही सुजाता या गेल्या दहा ते अकरा वर्षांपासून देशाची सेवा करतात त्यांचे प्राथमिक शिक्षण सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळा बाची या गावात झाले. तर माध्यमिक शिक्षण अमरजोत शिक्षण सेवा मंडळ संचलित रामलिंग हायस्कूल तुरमुरी या ठिकाणी झाले. मराठा मंडळ बेळगाव या महाविद्यालयात पिऊसी प्रथम आणि द्वितीय वर्ष शिक्षण झाले. दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित भाऊराव काकतकर महाविद्यालयाध्ये बीएससी पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
<span;>बालावयापासूनच अतिशय कष्टाची जाणीव असल्याने शिक्षण आणि शेतातील कामे करून आपले शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. शाळेपासूनच वेगवेगळ्या खेळांच्या मध्ये सहभाग घेतला होता त्यामध्ये खो – खो, कबड्डी, थ्रो बॉल, ॲथलेटिक, गोळा फेक भालाफेक यासह विविध स्पर्धांमध्ये भाग घेउन अनेक बक्षिस त्यांनी मिळवलेले आहेत.
<span;>सुजाता लक्ष्मण गुंजीकर या 18 ऑक्टोबर 2014 साली भरती झाल्या. बंगलोर ( कर्नाटक ) मधील जीसी सेंटर मध्ये त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले प्रशिक्षण घेत असताना त्यांनी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन अनेक बक्षिसे मिळवलेले आहेत त्यांचे बंगलोर मधील प्रशिक्षण अतिशय खडतर आणि कष्टदायी असून त्यांनी जिद्दीने आत्मविश्वासने पूर्ण केलेले आहे.
<span;>त्यानंतर अजमेर (राजस्थान) येथेही काही महिने प्रशिक्षण घेतले. आतापर्यंत त्यांनी पश्चिम बंगाल, पंजाब , हरियाणा, दार्जिलिंग , झारखंड, कर्नाटक, महाराष्ट्र आणि रांची त्या ठिकाणी अतिशय उत्तमरीत्या त्यांनी सेवा बजावलेली आहे. या पदावर कार्यरत असतानाच त्यांनी ग्लोबल पोजीशनिंग सिस्टम, व्हर्चुअल प्रायव्हेट नेटवर्क, आणि संगणकाचे प्रशिक्षण हे त्यांनी घेतलेले आहे आणि वेगवेगळ्या ज्युनिअर प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थींना वेळोवेळी त्यांनी मार्गदर्शन करत असतात.
<span;>सुजाता गुंजकर यांनी विविध ठिकाणी कार्य केले
<span;>1. सिग्नल बटालियन दिल्ली
<span;>2. सिग्नल बटालियन तेलंगणा, आंध्र प्रदेश
<span;>3. सिग्नल बटालियन वेस्ट बंगाल कलकत्ता
<span;>4. सिग्नल बटालियन छत्तीसगड
<span;>5. सिग्नल बटालियन चंदिगड पंजाब
<span;>6. सिग्नल बटालियन जम्मू काश्मीर
<span;>7. सिग्नल बटालियन मणिपूर
<span;>8. 213 महिला बटालियन अंडर सेकंड सिग्नल नागपूर महाराष्ट्र या ठिकाणी आपल्या कार्याचा आगळा ठसा उमटवलेला आहे.
<span;>सुजाता लक्ष्मण गुंजकर या आता सध्या
<span;>213 महिला बटालियन अंडर सेकंड सिग्नल नागपूर महाराष्ट्र या ठिकाणी सध्या कार्यरत आहेत.
<span;>बेळगाव तालुक्यातील वास्तविकता आणि इतर मुली वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असताना त्यांनाही पाहून देश सेवा करण्याची तीव्र इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाले आणि अतिशय जिद्द चिकाटी मेहनत करून त्यांनी देश सेवेत जाण्याचा निर्णय घेतला. बाल वयापासून ते माध्यमिक शिक्षण घेत असताना देश सेवेत जाण्याची त्यांना आवड निर्माण झाली. त्यांना वडील लक्ष्मण भारमा गुंजीकर, आई भारता लक्ष्मण गुंजकर आणि भाऊ सागर लक्ष्मण गुंजीकर यांची साथ वेळोवेळी मिळत गेले आणि त्यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन आहे. सुजाता यांना मिळाल्यामुळे त्या योग्य ठिकाणी पोहोचण्यास योग्य ठरल्या आहेत.
<span;>देश सेवेत जाण्याचे महिलांचे प्रमाण आज दिवसेंदिवस वाढत जाताना दिसत आहे हे सर्व तरुणांना आणि तरुणींना आदर्श देणारे प्रेरणा देणारे ठरले आहे. बेळगाव परिसरातील विशेषता ग्रामीण भागातील अनेक युवती देशसेवेमध्ये आहेत तरी याही पुढे वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये युतींना प्रशिक्षण देऊन सक्षम करण्याचे कार्य बेळगाव जिल्हा सह पूर्ण संपूर्ण देशात प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. बेळगाव सारख्या भागामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये युतींनी मजल मारावी आपलं कर्तृत्व सिद्ध करावा यासाठी प्रेरणा दिली जाते मात्र युवतीने सैन्य दल किंवा रिझर्व पोलीस दलात भरती होण्यासाठी योग्य ते प्रयोग प्रोत्साहन आणि प्रशिक्षण मिळणे हे आवश्यक आहे ते कुठेतरी बेळगावकरांच्या मध्ये कमी प्रमाणात दिसून येते . बेळगाव मध्ये महिला सक्षमीकरणासाठी आणि महिला सबलीकरणासाठी युतीच्या प्रशिक्षणासंदर्भात मोठी केंद्र उभे करून त्यांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्याची आज नितांत गरज निर्माण झाली आहे. सुजाता लक्ष्मण गुंजीकर यांचे कार्य आजच्या नवीन तरुण पिढीला प्रेरणा देत राहील.
<span;>*सुजाता गुंजकर यांचा येणाऱ्या नव्या पिढीला प्रेरणा देणारा संदेश*
<span;>आजच्या पिढीला सुजाता गुंजीकर यांनी नव्या पिढीला संदेश दिला आहे त्यामध्ये आजच्या आधुनिक काळात स्पर्धात्मक युगात सामोरे जाण्यासाठी आपल्यामध्ये सक्षमता निर्माण करायला हवे. येणाऱ्या असंख्य अडचणींना सामोरे जाण्यासाठी आपल्यामध्ये खडतर प्रयत्न जिद्द मेहनत चिकाटी नेतृत्व गुण अभ्यासूवृत्ती आणि कार्यात असणारा सातत्यपणा तो टिकवणे अत्यंत महत्त्वाचा आहे यासाठी वेळेचा सदुपयोग करून यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे तसेच आजच्या युगात ज्ञानाशिवाय दुसरी गोष्ट नाही त्यासाठी जगातील वेगवेगळ्या ज्ञान मिळवण्यासाठी अवांतर वाचन करून देशातील माहिती आणि ज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. अनेक वाईट सवय ना फाटा देऊन चांगल्या सवयींचा अविष्कार करणे महत्त्वाचे आहे. आई वडील गुरुजन यांना नेहमी आदर ठेवून समाजाची सेवा करण्यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे प्रत्येकाने देश सेवा करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा.