सुट्टी न दिल्याने नाराज झालेल्या बस चालकाने बसमध्येच आत्महत्या केल्याची घटना बेळगावात घडली आहे. बसमध्येच गळफास घेऊन बस चालकाने आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. भालचंद्र एस. तुकोजी (५४) असे आत्महत्या केलेल्या बस चालकाचे नाव आहे.
भालचंद्र तुकोजी यांच्या भाचीचे लग्न होते. त्यामुळे भालचंद्र यांनी वरिष्ठाच्याकडे रजा मागितली होती. पण वरिष्ठानी सुट्टी देण्यास नकार दिला.त्यामुळे नाराज झालेल्या भालचंद्र यांनी बेळगाव आगार क्रमांक दोन मध्ये उभ्या असलेल्या बसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.आत्महत्येची बातमी कळताच भालचंद्र यांच्या कुटुंबियांनी बस आगारात धाव घेऊन एकच आक्रोश केला. https://dmedia24.com/further-hearing-on-the-notice-of-shubham-shelkes-deportation-on-7th/
कायदा सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी बस आगाराला भेट दिली. मार्केट पोलीस स्थानकात सदर घटनेची नोंद झाली आहे.