ड्युटी बदलली नाही म्हणून बसमध्येच मेकॅनिकची गळफास घेऊन आत्महत्या
बेळगाव: ड्युटी बदलली नाही या कारणाने केएसआरटीसीच्या मेकॅनिकने बसमध्येच फासे लावून आत्महत्या केली. बेळगावच्या डिपो 1 मध्ये अल्नावर बेळगाव बसमध्ये मेकॅनिकने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.https://dmedia24.com/mla-abhay-patils-civilian-problem-in-ward-no-21/
कर्मचाऱ्याचे नावं केशव कमडोळी वय (57) असे आहे. बेळगावच्या जुन्या गांधी नगरमधील रहिवासी केशव, बस डेपो गॅरेज मध्ये बसचा पंक्चर काढण्याचे काम करत होता. मृत्यू केशवला पाठदुखी असूनही पंक्चर काढण्याचे काम अधिकाऱ्यांनी लादले असल्याची माहिती उपलब्ध आहे.
डिपो व्यवस्थापक लिंगराज लाठी, सहाय्यक कार्याधिकारी अनिल बांदेकर यांच्याकडे कुटुंबियांनी विनंती केली होती. कामाच्या ताणाला तोंड देऊ शकल्यामुळे केशवने आत्महत्या केली असल्याने अधिकाऱ्यां विरोधात मृत केशवच्या कुटुंबियांनी आरोप केला आहे.ठिकाणी मार्केट पोलीस ठाण्यातील पोलीस भेट देऊन तपासणी करत आहेत.