हर्पिक प्राशन करून आत्मह; सामात्येचा प्रयत्नजिक कार्यकर्त्यांच्या तत्परतेमुळे जीव वाचला
बेळगाव : मारुती गल्लीत मारुती मंदिराजवळ एका तरुणाने नैराश्यामुळे हर्पिक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
स्थानिकांनी तात्काळ सामाजिक कार्यकर्त्यांना संपर्क साधला. माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडवेकर आणि श्रीराम सेना हिंदुस्तानचे कार्यकर्ते नारू नीलाजकर घटनास्थळी धावून आले. अवधूत तुडवेकर यांनी त्वरित मीठ आणि पाण्याचे द्रावण दिल्याने संबंधित व्यक्तीला उलट्या होऊ लागल्या. त्यानंतर त्याला तातडीने शासकीय सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात आले.
सामाजिक कार्यकर्त्यांच्या दक्षतेमुळे एकाचा जीव वाचला असून स्थानिकांनी याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.