अशी असणार समितीच्या उमेदवाराची निवड प्रक्रिया
कर्नाटक विधानसभा निवडणुकीची करिता शहर महाराष्ट्र एकीकरण समितीने निवड प्रक्रिया राबविण्याचा निर्णय बैठकीत घेतला. यावेळी सदर बैठक मराठा मंदिर येथे आयोजित करण्यात आली होती यावेळी बैठकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला.
यावेळी बैठकीत दक्षिण मतदार संघाचा उमेदवार निवडण्यासाठी 12 सदस्यांची कमिटी बनविण्यात आली आहे. तर कमिटी दक्षिण भागातील गल्ली गावातील निवड सदस्यांची यादी बनविणार आहे सदर निवड कमिटीच्या माध्यमातून उमेदवार निवडला जाणार आहे.
करिता शहरातील दक्षिण आणि उत्तर मतदार संघासाठी चार ते सहा एप्रिल असे तीन दिवस इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागविले जात आहेत यासाठी इच्छुकाने सकाळी दहा ते सायंकाळी साडेसहाच्या वेळेत दीड लाख रुपये अनामत रक्कम आणि पन्नास हजार रुपये देणगी सह अर्ज भरावयाचे आहेत अशा निर्णय यावेळी बैठकीत घेण्यात आला.
यावेळी उत्तर मतदारसंघाकरिता रायमन वाझ दत्ता जाधव यांच्या नेतृत्वाखाली कमिटी बनवून उमेदवार निवडण्याचे ठरविण्यात आले. बैठकीला महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.