महिलेच्या मेंदूतील गाठीची यशस्वीरित्या शस्त्रक्रिया
केएलईएस डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल, बेळगाव येथील न्यूरोसर्जनच्या पथकाने 33 वर्षीय महिलेच्या मेंदूतील एक गाठ यशस्वीरित्या काढून टाकून तिला जीवन जगण्यास एक नवीन आशेचा किरण भेट दिला आहे .
सदर महिला पूर्णपणे जागृत असताना ट्यूमर काढून टाकण्यात आला आणि शस्त्रक्रिया पुढे जात असताना तिचे हात हलवत आणि डॉक्टरांशी बोलणे चालू होते .शस्त्रक्रियेनंतर तिने 2 तासात अन्न खाणे आणि चालणे सुरू केले आणि 3 दिवसांनी ती घरी परतली
बेळगाव येथील केएलईएस रुग्णालयात प्रथमच जागृत मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली. न्युरोसर्जन डॉ. अभिषेक पाटील आणि डॉ. विक्रम टी पी यांनी या यशस्वी शस्त्रक्रियेचे नेतृत्व केले. डॉ नरेंद्र पाटील, डॉ पूर्वश्री देशमुख आणि डॉ रवी केरूर यांच्या ऍनेस्थेसिया टीमचे अमूल्य योगदान दिले .