*मराठा मंडळ सेंट्रल हायस्कूलच्या विद्यार्थ्याचे घवघवीत यश*
बेळगाव: चव्हाट गल्ली येथील मराठा मंडळ सेंट्रल हायस्कूलचा विद्यार्थी कुमार समर्थ परशराम बागेवाडी यांने २०२५ च्या दहावीच्या बोर्ड परीक्षेत ६२५ पैकी ६०८ गुण (९७.२८%) मिळवून संस्थेमध्ये सर्वोच्च स्थान पटकावले आहे. त्याचबरोबर त्यांने शाळेतही प्रथम क्रमांक मिळवून उल्लेखनीय विक्रम नोंदवला आहे.
बेळगावजवळील अगसगा गावातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या समर्थने कोणत्याही अतिरिक्त शिकवणीचा आधार न घेता, केवळ स्वतःच्या मेहनतीने हे यश साध्य केले आहे. त्याच्या या यशाला मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सौ. राजश्री नागराज (मॅडम) यांचे प्रोत्साहन तसेच मुख्याध्यापक श्री. बी. एम. पाटील व शिक्षक वर्गांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले आहे.
समर्थच्या या यशाने संस्था, शाळा आणि गावाचा सन्मान वाढविला असून, त्याच्या भविष्यातील प्रगतीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.