सुभाष चंद्र नगर नागरिक संघटनेच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा
बेळगाव-सुभाष चंद्र नगर नागरिक संघटनेच्या वतीने आझाद बागेत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. उपाध्यक्ष राजेश तेंडुलकर यांनी स्वागत चंद्रशेखर इट्टी यांनी पाहुणे सौ शीला व दिलिप हंगिरगेकर यांना सन्मानित केले.
हंगिरगेकर यांच्या हस्ते ध्जारोहण करण्यात आले. मंगीराम जांगरा यांनी मिठाई वाटली तर अनंत सावंत यांनी चहा व नाश्टाची व्यवस्था केली. संघटनेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ चौगुले, आप्पासाहेब गुरव, प्रकाश गोखले, पदाधिकारी गौरव पटेल, गजाननराव राणे , शिवानी करडे, सीमा करडे व इतर उपस्थित होते. विद्या ईट्टी यांनी सूत्र संचालन केले