बस पास मुदत वाढीसाठी विद्यार्थ्यांनी छेडले आंदोलन
2022-2023 च्या विद्यार्थ्यांच्या बस पासची मुदत वाढवण्यासाठी विद्यार्थी आज आंदोलन छेडले.यावेळी ABVP कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांनी 2022-2023 या वर्षासाठी विद्यार्थ्यांच्या बस पासची मुदत वाढवण्यासाठी शहरातील KSRTC बस स्थानकावर निदर्शने केली.
सन 2022-2023 पदवी आणि PG विद्यार्थ्यांचा बस पास कालावधी 30.06.2023 रोजी संपत आहे .परंतु सेमिस्टर अद्याप चालू आहे आणि नवीन बस पास सेमिस्टर संपल्यानंतर जारी केले जाणार आहे .
मात्र कोरोनाच्या कालावधीपासून सेमिस्टर बदलले असून चालू सत्र संपण्यापूर्वी आणखी ३ महिने वर्ग घेण्यात येणार आहेत.तसेच जुन्या बस पासची मुदत वाढवून देण्यासाठी ते विद्यार्थ्यांकडून पैसे घेत आहेत.
हे शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत व नवीन बस पास मिळेपर्यंत कोणत्याही प्रकारचे पैसे न घेता विद्यार्थ्यांना प्रवास करण्याची सुविधा द्यावी, अन्यथा येत्या काळात आंदोलन पुकारावा लागेल, अशी मागणी कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे विद्यार्थ्यांनी केली.